ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आर्थिक परिस्थिती लक्षात घेता राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य, लोकप्रतिनिधींच्या वेतनात या महिन्यापासून म्हणजे एप्रिल 2020 पासून एप्रिल 2021 पर्यंत 30 टक्के वेतन कपात करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला.
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कोरोनाला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करता आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमदारांच्या वेतनात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.









