मडिलगे/प्रतिनिधी
मुंबईमध्ये ३००आमदारांना घरे देणार या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये जाहीर केलेल्या घोषणेच्या निषेधार्थ मडिलगे खुर्द (ता. भुदरगड) येथील सर्व तरुण मंडळे आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यानी भिक मांगो आंदोलन करत गल्लोगल्ली भिग मागत निषेध मोर्चा काढला. गावातील महिलांसह अबालवृद्धांनीही या मोर्चामध्ये सहभाग दर्शवून आमदारांच्या घरांसाठी दारोदारी भिक मागत एक एक रुपया जमवून प्रतिनिधिक स्वरुपात निधी जमा केला.
यावेळी गावातील सर्व तरुण मंडळे तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी विधानसभेत मुख्यमंत्र्यानी मुंबईत आमदारांसाठी घरे देणार हा निर्णय मागे घेवून मेघोली धरणफुटी दुर्घटनेमुळे अनेकांची घरे, गोठे वाहून गेले अशा बेघर झालेल्या गरजू , गरीब, शेतकऱ्यांना घरे द्यावीत अशी मागणी अनेक कार्यकर्त्यांनी केली. यावेळी पांडुरंग खराडे, सचिन केसरकर, अशिष मांडे, नामदेव चौगले, प्रवीण मांडे, दत्तात्रय मगदूम, ओमकार मांडे, किरण आरडे, विजय खराडे, शुभम मगदूम, नामदेव खराडे, श्रावन कोळस्कर, सागर मांडे, निलेश मगदूम, तुषार मांडे, भाऊ बिरंबोळे, दयानंद करडे, रजत कल्याणकर यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.