प्रतिनिधी/ बेळगाव
येथील पर्यटन केंद्रामध्ये आमदार अनिल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका, पीडब्ल्यूडी, स्मार्ट सिटी, मायनर इरिगेशन, एल ऍण्ड टी, गॅसपाईप लाईन, हेस्कॉम या विभागांच्या अधिकाऱयांची बैठक घेण्यात आली. विविध विभागातून आलेल्या 197 कोटी रुपयांच्या फंडाचा आराखडा यावेळी घेण्यात आला.
आमदार बेनके यांनी ज्या कोणत्या विभागाला पाईपलाईन घालावयाची आहे, त्यांनी पुढील महिन्यापर्यंत ते काम पूर्ण करावे. त्यानंतर रस्ते खोदायला परवानगी दिली जाणार नाही. नागरिकांच्या तक्रारी असल्यास त्या आपल्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे सांगितले. एल ऍण्ड टी कंपनीच्या दिरंगाईमुळे अनेक रस्त्यांची व गटारांची कामे रखडली असून त्यामुळे अडचणी येत आहेत. रस्ते तयार करण्यापूर्वी गॅसलाईन बसविणे, अंडर पॉवर केबल टाकणे आणि पाण्याचे पाईप बसविणे ही कामे एल ऍण्ड टी, गॅस कंपनी व केबलच्या अधिकाऱयांनी पूर्ण करावीत, अशी सूचना केली.









