जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
नाथ पै नगर-अनगोळ येथे गेल्या 30 ते 40 वर्षांपासून अनेक कुटुंबे राहत आहेत. त्यांनी रितसर जागा खरेदी करुन घरे बांधली आहेत. असे असताना एका जागा मालकाने रस्ता बंद करुन त्या ठिकाणी भिंत बांधली आहे. त्यामुळे त्या कुटुंबियांना आपल्या घराकडे जाणे कठीण झाले आहे. तरी आम्हाला तातडीने रस्ता करुन द्यावा, अशी मागणी नाथ पै नगर येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नाथ पै नगर-अनगोळ येथील ही जमीन एनए करण्यात आली आहे. तहसीलदारांनी ती 1976 मध्ये एनए केली आहे. तेंव्हापासून त्या जागेमध्ये नागरिक राहत आहेत. असे असताना अचानकपणे पुरूषोत्तम केशव चौगुले, बाळू भाटे, एकनाथ केशव चौगुले यांनी रस्त्यासह आम्ही जागा खरेदी केली आहे म्हणून पुढे जाणारा रस्ताच बंद केला आहे. याबाबत महापालिकेकडे आणि बुडाकडे तक्रार केली असता ते दुर्लक्ष करत आहेत. तेंव्हा आम्हाला तातडीने रस्ता करुन द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी प्रकाश होसूरकर, रावसाब माने, बसवंत ताशिलदार, उमेश पोटे, जोतिबा पोटे, यल्लाप्पा पोटे, श्रीकांत ताशिलदार यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.









