ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
वर्ल्ड बँकेने भारतीय अर्थशास्त्रज्ञ आभास झा यांची दक्षिण आशियातील हवामान बदल, आपत्ती व जोखीम व्यवस्थापन विभागात प्रक्रिया व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली आहे.
सिंगापूर येथे झा यांची नियुक्ती झाली असून, ते दक्षिण आशियातील नैसर्गिक आपत्तींवर प्रक्रियात्मक व्यवस्थापकीय उपाय सुचविण्याचे काम करतील. जागतिक हवामान बदल व इतर काही समस्यांवर उच्च प्रतीची विकासात्मक प्रक्रिया स्वरूपाची उत्तरे सुचवण्याची जबाबदारी त्यांच्या विभागावर आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा व बांगलादेश यांना अम्फान वादळाचा तडाखा बसलेला असतानाच त्यांची या विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.
झा यांनी २००१ मध्ये बांगलादेश, भूतान, भारत आणि श्रीलंका या बँक कार्यालयांमध्ये कार्यकारी संचालक म्हणून वर्ल्ड बँकेत प्रवेश घेतला. याव्यतिरिक्त, त्यांनी लॅटिन अमेरिका, कॅरिबियन, युरोप, मध्य आशिया, पूर्व आशिया आणि पॅसिफिकमध्ये काम केले आहे.









