वार्ताहर / चंदुर
हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथील आभार फाटा ते शाहूनगर वरून इचलकरंजीला जोडणाऱ्या मेन रोडवर गेल्या कित्येक वर्षांपासून मोठं मोठे खडे पडले आहेत. त्यातच शाहूनगर भागात अंतर्गत गटारी केल्यावर त्याचे पाणी थेट मेन रोडवर येत आहे व रस्त्यावरील खड्यामध्ये गटाराचे पाणी साचून राहत असल्याने नागरिकांना रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.
तसेच रस्त्यावरील खड्डे आकाराने मोठे असल्याने वाहतूक करताना नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे व आतापर्यंत या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत.
त्यामुळे हा रस्ता तात्काळ दुरुस्त करून त्याचे रुंदीकरण व्हावे या मागणीसाठी आज चंदूरच्या नागरिकांनी, जिल्हाअधिकारी, प्रांताअधिकारी, आमदार प्रकाश आवाडे व चंदूर ग्रामपंचायतला आज निवेदन दिले आहे. व मागणी केली आहे. त्याचबरोबर हा रस्ता लवकर न झाल्यास वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा चंदूर ग्रामस्थांनी दिला आहे. निवेदन देताना चंदूरचे संदीप जाधव, भगवान पुजारी, संतोष पुजारी,डॉ. खानाप्पा पुजारी, संजय जिंदे, सुरज लाड आदी नागरिक उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









