ओटवणे / प्रतिनिधी:
विलवडे गावात पुराचे संकट ओढवताच या गावचे सुपुत्र तथा नवी मुंबई महानगरपालिकेचे परिवहन सभापती रामचंद्र उर्फ आबा धर्माजी दळवी पुन्हा एकदा विलवडेवासियांच्या मदतीला धावून आलेत. त्यांनी या गावातील ४२ पूरग्रस्त कुटुंबिंयांना प्रत्येकी ५ ते १० हजार रुपयेपर्यंत अशी एकूण अडीच लाख रुपयांची मदत करून पूरग्रस्तांना धीर दिला आहे. आबा दळवी यांच्या घराण्याला समाजसेवेचा वारसा लाभलेला आहे. त्यांचे वडील कै धर्माजी दळवी यांचा वारसा आबा दळवी यांनी जपला आहे. त्यांचे गावाच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा उपक्रमांना नेहमीच सहकार्य असते. समाजसेवेचा पिंड असलेल्या आबांना आपल्या गावात भरवस्तीत पुराचे पाणी शिरल्याचे त्यांना समजताच ते अस्वस्थ झाले. त्यांनी तात्काळ परिस्थितीची सर्व माहिती घेत पूरग्रस्त कुटुंबांना मदत करण्याचे ठरवून अडीच लाख रुपयांची मदत गावाकडे पाठवून दिली.
अर्चना परशुराम दळवी, श्रावण न्हानू दळवी, प्रभाकर सखाराम दळवी, चंद्रकांत पांडुरंग दळवी, उत्तम सदाशिव दळवी (प्रत्येकी दहा हजार), लक्ष्मण कृष्णा सावंत, लीला राजाराम सावंत, गोपाळ बाबाजी दळवी, जितेद्र गोविंद दळवी, भरत कृष्णा सावंत (प्रत्येकी साडेसात हजार), अर्जुन जिवबा सावंत, सुकाजी महादेव दळवी, सखाराम गणू सावंत, प्रतिभा प्रकाश दळवी,रविंद्र महादेव सावंत, नरेंद्र लक्ष्मण दळवी, नंदकिशोर भिकाजी दळवी, यशवंत लक्ष्मण दळवी, विश्राम भिकाजी दळवी, विठ्ठल कृष्णा दळवी, परशुराम महादेव दळवी, अरुण भिकाजी दळवी, विमल नारायण सावंत, विजय राजाराम दळवी, रविद्र वसंत नाईक, दिंगबर बाळा दळवी, सखाराम भिकाजी दळवी, विष्णु विश्राम दळवी, रत्नामाला बोंबडे दळवी, सुरेश अनंत दळवी, सिताराम कृष्ण दळवी, जयप्रकाश यशवंत दळवी, भाई मधुकर सावंत, रमेश मधुकर सावंत , शंकर मधुकर सावंत, बळीराम न्हानु दळवी, दिपक धनंजय देसाई, संभाजी गोपाळ दळवी, श्रीराम अंकुश सावंत,यजमर्ती पास्को गोन्साल्विस,एस्टोरेन गास्पेन गोन्साल्विस, फिलिप्स पावलो गोन्साल्विस (प्रत्येकी पाच हजार ) अशी एकूण अडीच लाख रुपयांची विलवडे गावातील ४२ पूरग्रस्त कुटुंबियांना मदत करण्यात आली.