असनिये माजी सरपंच एम डी सावंत यांचे प्रतिपादन
ओटवणे / प्रतिनिधी:
असनिये हायस्कूलच्या उभारणीत आबासाहेब तोरसकर यांचे मोलाचे योगदान आहे. ग्रामीण व दुर्गम गावात माध्यमिक शिक्षणाची त्यांनी सोय केल्यामुळे त्यांचे शैक्षणिक कार्य चिरकाल टिकणारे आहे. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात मोठी हानी झाली असून शिक्षण क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात असनिये माजी सरपंच एम डी सावंत यांनी श्रद्धांजली वाहिली.
असनिये येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संस्थेचे कार्याध्यक्ष तथा मराठा नाट्य मंदिर मुंबईचे अध्यक्ष कै आबासाहेब तोरसकर यांच्या श्रद्धांजली सभेत एम डी सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी आबासाहेब तोरसकर यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी असनिये सरपंच स्नेहल असनकर, प्रशालेचे मुख्याध्यापक कैलाश जाधव, जेष्ठ शिक्षक जी.एल सावंत, जान्हवी सावंत, भास्कर राठोड, गजानन सावंत, सुधाकर घोगळे, नामदेव असनकर, बाबली सावंत, शालेय समितीचे सर्व सदस्य, पालक विद्यार्थी उपस्थित होते.