ऑनलाईन टीम / पणजी
यंदाच्या निवडणुक तयारीत आम आदमी पक्षाने शनिवारी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली.दिल्लीचे आमदार आणि आम आदमी पार्टीचे गोवा डेस्क प्रभारी आतिशी यांनी या बद्दलचे ट्विट केले असून “गोवा विधानसभा निवडणूक, २०२२ साठी उमेदवारांची सहावी यादी जाहीर करताना आनंद होत आहे असे ही ते म्हणाले आहेत.
पक्षाने जाहीर केलेले तीन उमेदवार आणि त्यांचे मतदारसंघ पुढीलप्रमाणे आहेत.
1) वास्को – अधिवक्ता सुनील लोरान
२) मांद्रे – अधिवक्ता प्रसाद शहापूरकर
3) पर्वरी – रितेश चोडणकर
निवडणुकीच्या रन अपमध्ये, आप ने आधीच आपले 36 उमेदवार जाहीर केले आहेत आणि एक प्रसिद्ध वकील-राजकारणी अमित पालेकर यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. सध्या ‘आप’ला गोवेकराकडून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. याशिवाय, आप चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी अलीकडेच गोव्यासाठी 13-सूत्री कार्यक्रमाचे अनावरण केले, ज्यामध्ये 300 युनिटपर्यंत मोफत वीज, खाणकाम पुन्हा सुरू करणे, सर्वांसाठी नोकऱ्या आणि बेरोजगारांना भत्ता, गोव्यातील प्रत्येक कुटुंबाला देण्याचे आश्वासन दिले आहे.