प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे खासगी हॉस्पिटल बंद ठेवण्यात आले आहेत. डॉक्टरही आपले दवाखाने बंद ठेवले आहेत. त्यामुळे कोरोना नसलेल्या अत्यावश्यक व्यक्तीला उपचार मिळणे अवघड झाल्याने अनेकांचा मृत्यू होत आहे. तेंव्हा शहरामध्ये काही खासगी हॉस्पिटल अत्यावश्यक उपचारासाठी सुरु ठेवावेत, अशी मागणी हेल्प फॉर नीडी संघटनेने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
कोरोनाला डॉक्टरही घाबरले आहेत. असे असले तरी कोरोना नसलेल्या व्यक्तींना उपचार मिळणेही गरजेचे आहे. उपचार न मिळाल्याने म. ए. समितीचे नेते वाय. बी. चौगुले यांचाही मृत्यू झाला होता. अशा प्रकारे अनेकांचा अत्यावश्यक वेळेला उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे अनेकांना प्राण गमावावे लागले आहेत. तेंव्हा तातडीने शहरामध्ये किमान दोन हॉस्पिटल तरी अत्यावश्यक सेवेसाठी सुरु ठेवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
सरकारने कोरोना उपचारासाठी खासगी हॉस्पिटल्सना 5 हजार रुपये दर निश्चित केला आहे. असे असताना काही हॉस्पिटल अधिक दर आकारण्याचा प्रयत्न करत आहेत. तेंव्हा सरकारने सर्व खासगी हॉस्पिटल्सना निश्चित केलेला दर घ्यावा, असा आदेश द्यावा, अशीमागणी करण्यात आली. यावेळी सुरेंद्र अनगोळकर, मानसी चौगुले, संध्या पेरणूरकर-पाटील, हेमा काजगार, सुधा हालण्णावर, शहानवाज मुल्ला, खताल गच्चवाले, अंजुम, सुरेश शिंदे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.









