ऑनलाइन टीम / मुंबई :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली आहे. तसेच कोरोनाच्या लढाईसाठी पंतप्रधानांनी अर्थिक योगदानाचे आवाहन केले आहे. या आवाहनाला देशभरातून सामान्य लोक ते बॉलीवुड कलाकारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
आता बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजग देवगण याने ट्विट करत मुंबई पोलीसांच्या जोडीने मैदानात उतरण्याची तयारी दर्शवली आहे.
अजय देवगणने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘प्रिय मुंबई पोलीस, तुम्ही जगातले सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखले जाता. कोविड – 19 च्या साथीच्या काळात तुमचे योगदान अतुलनीय आहे. आपण फक्त हाक द्या, हा ‘सिंघम’ आपली खाकी परिधान करून आपल्या बाजूला उभा राहील…जय हिंद जय महाराष्ट्र’
यापूर्वी कोरोना लढ्यासाठी अजय देवगणने 25 कोटी 51 लाख रूपयांची मदत केली आहे. यापैकी 15 कोटी पी एम केअर फंडासाठी, 5 कोटी महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तर 5 कोटी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहेत.
तर उरलेले 51लाख रुपये ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्प्लॉईज’ ला मदतीच्या स्वरूपात दिले आहेत.









