प्रतिनिधी /पणजी
आम आदमी पार्टीची रोजगार यात्रा रविवारी कुडतरी मतदारसंघात दाखल झाली. या यात्रेदरम्यान आप स्वयंसेवकांनी मतदारसंघाचा दौरा केला. रिया जंक्शन, इलाहा डी राशोल बस स्टॉप आणि विरभट चॅपल, कुडतरी येथे बूथ बैठका घेण्यात आल्या. या यात्रेला रहिवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला. बूथ स्तरावरील बैठकांना शभंराहून अधिक रहिवाशांनी हजेरी लावून केजरीवाल यांच्या नोकरी हमीसाठी नोंदणी केली.
कुडतरी मतदारसंघ विकासावाचून वंचित राहिला आहे. कुडतरीचा तरुणवर्ग रोजगार नसल्याने आणि साथीच्या काळात मंदीमुळे अनेक संधी गमावल्यामुळे निराश आहेत. उत्पन्न नसल्यामुळे कुटुंबांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. कुडतरीच्या रहिवाशांनी ’आप’च्या गोव्यातील तरुणांना रोजगार देण्याच्या घोषणेच स्वागत केले.
कुडतरी मतदारसंघातील रोजगार यात्रेला आप कुडतरी विधानसभा प्रभागाचे प्रभारी रॉक मास्करेन्हास यांनी ध्वज फडकावून प्रारंभ केला. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना त्यांनी, “आप सरकार सत्तेवर येईल, तेव्हा गोव्याच्या रोजगाराच्या परिस्थितीत बदल होईल. केजरीवाल यांच्या वचनाने तरुणांसाठी संधी वाढतील. नोकऱयात 80 टक्के राखिवता आणि गोव्यासाठी कौशल्य विद्यापीठ निर्माण करण्याच्या योजनेबद्दल गोव्यातील तरुण उत्साहित आहेत.









