प्रतिनिधी / शिरोडा
आम आदमी पक्षातर्फे शिरोडा मतदारसंघात पंचवाडी येथे वीज जागृती आंदोलन करण्यात आले. यावेळी आम आदमी पक्षाचे नेते ऍड. सुरेल तिळवे, स्थानिक नेते योगेश खांडेपारकर व दिनेश बोरकर उपस्थित होत. आपने दिल्लीतील जनतेसाठी राबविलेल्या विविध योजनांची योगेश खांडेपारकर यांनी माहिती दिली.
वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण आदी सेवा दिल्लीमध्ये स्वस्त दरात उपलब्ध आहेत, असे योगेश खांडेपारकर यांनी सांगितले. सुरेल तिळवे यांनी दिल्ली हा केंद्रशासीत प्रदेश असून तिथे विकासकामांसाठी लेफ्टनंट जनरलची परवानगी घ्यावी लागते. मात्र गोवा हे घटक राज्य असल्याने इथल्या सरकारला जास्त अधिकार आहेत. आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यास गोवा आदर्श राज्य बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्यासाठी गोवेकरांनी आपला संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी वीज व इतर सरकारी सेवांचा त्यांनी आढावा घेतला. स्वागत दिनेश बोरकर यांनी केले.









