सातारा / प्रतिनिधी :
कोल्हापूरहून पुण्याला निघालेला साखरेचा ट्रक टायर फुटल्याने शनिवारी रात्री 1 वाजता आनेवाडी उड्डाणपूलावर पलटी झाला. या अपघातात ट्रक चालक आणि क्लिनर जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच भुईंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पलटी झालेला ट्रक दुभाजकावरुन साताऱ्याकडे जाणाऱ्या लेनवर आला आहे. त्यामुळे सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक पोलिसांनी वळवली आहे. कोल्हापूरहून दुसरा ट्रक बोलावून पलटी झालेल्या ट्रकमधील साखर त्यामध्ये भरुन नेण्यात येणार आहे.









