ताणतणाव आरोग्यासाठी किती घातक ठरू शकतात, हे आपण जाणतोच. ताण कमी करण्यासाठी आपण आतला आनंद शोधायला हवा. आठ तासांची शांत झोपही ताण कमी करू शकते. अर्थात हे सगळं मिळवण्यासाठी आपणच काही तरी करायला हवं. आसपास असणारे गंध, वस्तू तसंच आवाजाचा माणसाच्या शरीरावर परिणाम होत असतो. न्यूयॉर्कमधल्या द युनिव्हर्सिटी ऑफ वॉरमाँट मेडिकल सेंटरने एक संशोधन केलं. ताणतणाव आरोग्यासाठी किती घातक ठरू शकतात, हे आपण जाणतोच. काही क्रियांमुळे आपला ताण कमी होऊ शकतो तसंच चांगली झोप लागण्यासोबतच आपण आनंदीही राहू शकतो. या साध्या आणि सोप्या क्रिया तुम्हीही करू शकता.
* दैनंदिन आयुष्यात आपण बर्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. किंबहुना, दुर्लक्ष होत असतं. आपल्या बागेत उमललेल्या सुंदर फुलांकडेही आपण बघत नाही. तुम्ही आसपासच्या वातावरणाकडे लक्ष द्या. झाडाच्या फांदीवर बसलेले पक्षी, फुलं, एखादी छानशी कलाकृती अशा पाच गोष्टींची नोंद करा. आज आपण काय वेगळं बघितलं आणि कशातून आनंद मिळाला हे नोंदवून ठेवा.
* आसपासच्या चार वस्तूंना स्पर्श करा. स्पर्शातून या वस्तू अनुभवा. अगदी तुमच्या कपडय़ांवरील नक्षीकामही चालू शकेल. तुम्ही घरातल्या टेबलवरही हात फिरवू शकता.
* तीन प्रकारचे आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. पक्ष्यांचा किलबिलाट, सौम्य संगीत, पानांची सळसळ ऐका.
* काही गंध घेण्याचा प्रयत्न करा. स्वयंपाकघरात अन्न शिजत असताना येणारा गंध असो किंवा नव्याकोर्या वही, पुस्तकाचा गंध असो; वेगळे पण सुखावणारे गंध अवश्य घ्या. * शेवटी एखाद्या पदार्थाची चव घ्या. ती साधी बडिशेप असली तरी चालेल. पण तिची चव तुम्हाला जाणवायला हवी. या चवीची नोंद करून ठेवा.