429 रूग्ण कोरोनामुक्तः शिराळा तालुक्यात एकही रूग्ण वाढला नाहीः मनपा क्षेत्रात 27 ग्रामीण भागात 99 रूग्ण वाढले
प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यात चार महिन्यानंतर प्रथमच रूग्णसंख्या वाढीचा दर अत्यंत कमी झाला आहे. रविवारी जिल्ह्यात अवघे 126 रूग्ण वाढले आहेत. तर त्याच्या तिप्पट 429 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शिराळा तालुक्यात रविवारी एकही नवीन रूग्ण आढळून आला नाही. ही जिल्ह्यासाठी अत्यंत चांगली आनंदवार्ता आहे. उपचार सुरू असताना आठ जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर एक हजार 576 रूग्णांचा बळी गेला आहे.
मनपा क्षेत्रात फक्त 27
महापालिका क्षेत्रात रूग्ण वाढीचा दर घटला आहे. गेल्या चार महिन्यानंतर प्रथमच महापालिका क्षेत्रात इतक्या कमी संख्येने रूग्ण आढळून आले आहेत. ही अत्यंत दिलासा देणारी बाब आहे. सांगली शहरात अवघे 18 नवीन रूग्ण वाढले आहेत. तर मिरज शहरात नऊ रूग्ण वाढले आहेत. आजअखेर महापालिका क्षेत्रात 15 हजार 762 रूग्ण झाले आहेत. त्यातील 88 टक्के रूग्ण बरे झाले आहेत.
ग्रामीण भागात अवघे 99 रूग्ण वाढले
ग्रामीण भागात प्रथमच 100 पेक्षा कमी रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये शिराळा तालुक्यात चार महिन्यानंतर प्रथमच एकही नवीन रूग्ण वाढला नाही. आटपाडी तालुक्यात 19 रूग्ण जत तालुक्यात अवघे सहा रूग्ण वाढले आहेत. तासगाव तालुक्यात नऊ तर कवठेमहांकाळ तालुक्यात फक्त चार रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात आठ तर मिरज तालुक्यात नऊ रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 14 तर तासगाव आणि वाळवा तालुक्यात प्रत्येकी 15 नवीन रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे रविवारी जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवघे 99 रूग्ण वाढले आहेत.
आठ जणांचा बळी
जिल्ह्यात उपचार सुरू असताना आठ जणांचा बळी गेला आहे. यामध्ये मिरज शहरातील एकाचा तासगाव तालुक्यातील तिघांचा बळी गेला आहे. तर पलूस, जत, कवठेमहांकाळ, आणि शिराळा तालुक्यातील प्रत्येकी एका रूग्णांचा बळी गेला आहे. आजअखेर जिल्हÎातील उपचार सुरू असताना एक हजार 576 रूग्णांचा बळी गेला आहे.
नवीन रूग्णांच्या तिप्पट रूग्ण कोरोनामुक्त
रविवारी जिल्ह्यात नवीन 126 रूग्ण वाढले आहेत. त्याच्या तिप्पट रूग्ण म्हणजेच 429 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याला फार मोठा दिलासा मिळाला आहे. आजअखेर जिल्ह्यातील 38 हजार 545 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर सध्या उपचारात दोन हजार 737 रूग्ण आहेत.
2344 स्वॅब तपासले
जिल्ह्यातील दोन हजार 344 जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. यामध्ये आरटीपीसीमध्ये 876 रूग्णांचे तर रॅपीड ऍण्टीजनमध्ये एक हजार 438 रूग्णांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत यामध्ये 126 नवीन रूग्ण आढळून आले आहेत.
परजिल्ह्यातील दोघांचा मृत्यू
परजिल्ह्यातील रूग्णांच्यावर ही जिल्हÎात उपचार करण्यात येत आहेत. रविवारी नवीन एक रूग्ण वाढला आहे. सातारा जिल्ह्यातील हा रूग्ण उपचारासाठी दाखल झाला आहे. आजअखेर जिल्ह्यात एक हजार 301 रूग्ण दाखल झाले. त्यातील एक हजार 75 रूग्ण बरे झाले आहेत. तर उपचारात 23 रूग्ण आहेत. रविवारी सातारा येथील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजअखेर जिल्हÎात परजिल्ह्यातील 203 रूग्णांचा बळी गेला आहे.
नवीन रूग्ण 126
उपचारात 2737
बरे झालेले 38545
एकूण 42858
मृत्यू 1576








