प्रतिनिधी/ बेळगाव
आरोग्य म्हणजे केवळ शारीरिक आरोग्य नसून त्यासोबत सामाजिक व मानसिक आरोग्यही प्रत्येकाचे व्यवस्थित असावे लागते. त्यामुळेच आपण खऱया अर्थाने सुदृढ आयुष्य जगू शकतो. आजच्या या धक्काधुकीच्या आधुनिक युगात या तिन्ही गोष्टी साधता आल्या तरच आपण शारीरिकदृष्टय़ा सक्षम होऊ, असे मत डॉ. मनीषा जगताप यांनी व्यक्त केले.
सार्वजनिक वाचनालय संस्थेच्यावतीने आयोजित 45 व्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ‘स्त्रियांचे आरोग्य’ या विषयावर त्या बोलत होत्या. व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष गोविंद राऊत, उपाध्यक्ष कृष्णा शहापूरकर, ऍड. आय. जी. मुचंडी, नेताजी जाधव आदी उपस्थित होते. प्रारंभी वाचनालयाच्या पदाधिकाऱयांच्या हस्ते डॉ. मनीषा जगताप यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम रावसाहेब गोगटे रंगमंदिरात पार पडला.
डॉ. जगताप पुढे म्हणाल्या, वेळेवर व उत्तम आहार न घेतल्याने दिवसेंदिवस अनेक शारीरिक समस्या उद्भवतात. त्यामुळे प्रत्येक महिलेने आपला संसार सांभाळत आरोग्याकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. स्त्राr स्वतः सुदृढ असेल तरच एका सुदृढ बाळाला जन्म देऊ शकते. प्रत्येकांनी ताजे अन्न खाण्याकडे भर द्यावा. किमान चार तासांपूर्वी बनवलेल्या अन्नात योग्य ते गुणधर्म आपल्या शरीराला मिळतात. उघडय़ावरचे व फास्टफूड खाणे शक्मयतो टाळावे. आरोग्याबरोबरच महिलांनी नवनवीन गोष्टी शिकण्याकडे लक्ष केंद्रित करावे. त्यामुळे मनाला एक वेगळे समाधान प्राप्त होईल. दररोज महिलांनी अर्धा तास व्यायाम, वॉकिंग किंवा योग करणे गरजेचे आहे. योग-प्राणायम केल्याने एक प्रकारची मनःशांती लाभते. रोजच्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थाबरोबर नैसर्गिक खाद्याचा वापर करावा. दिवसभरात दोन ते तीन लीटर पाणी प्यावे. त्यामुळे महिलांच्या शारीरिक समस्या सोडविण्यास मदत होईल, असे सांगून उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.









