बीड/प्रतिनिधी
ओबीसींच्या आरक्षणावरून सर्वपक्षीय ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आधीच उपाशी त्यात उपवास अशी आज ओबीसीची स्थिती आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. पंकजा यांनी अनेक गावात अजूनही जातीच्या भिंती आहेत. समाजात अजूनही दरी दिसतेय, असे त्या म्हणाल्या. मुंडें साहेबांनी सामान्यांना मंचावर आणलं. आरक्षणाचा लढा कशासाठी आहे, जे अशक्त आहेत त्यांच्यासाठी आहे असे पंकजा मुंडे म्हणाल्या. जो जास्त संख्येने आहे, त्या बहुजन समाजाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १० टक्के आरक्षण दिलं, ज्यांची आर्थिक ताकत नाही त्या सर्वांना त्यांनी आरक्षण दिलं असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
(सविस्तर वृत्त लवकरच)








