पोस्ट, बेळगाव वन, बँकांमधील नोंदणी ठप्प
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने आधार नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. आधार नोंदणीसाठी बोटांचे ठसे आवश्यक असतात परंतु यामुळे संसर्ग वाढण्याची शक्मयता असल्याने आधार नोंदणी बंद करण्यात आली आहे. बेळगावमधील पोस्ट, बँका यांच्यासोबत बेळगाव वन कार्यालयातील आधार नोंदणी बंद करण्यात आली आहे.
नवीन आधार नोंदणी करणे त्याचसोबत नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक यामध्ये बदल करण्यासाठी आधार नोंदणी केंद्र मागील काही महिन्यांपासून सुरू ठेवण्यात आली होती. बेळगाव शहरासह तालुक्मयातील महत्त्वाच्या पोस्ट कार्यालयांमध्ये आधार नोंदणी सुरू होती. यामुळे नागरिकांना आपल्या घरालगत आधार नोंदणी करणे सहज शक्मय होत होते. यासोबत काही बँकांमध्येही आधार नोंदणी सुरू ठेवण्यात आली होती. बेळगाव शहरात असणाऱया बेळगाव वन कार्यालयांमध्येही आधार नोंदणी केली जात होती. अनेक कामांकरिता आधार क्रमांक आवश्यक असल्याने आधारकार्डवर कोणत्याही चुका राहिल्यास त्या दुरुस्त करून घ्याव्या लागतात.
नवीन आधार नोंदणी सोबत चुका दुरुस्त करण्यासाठी आधार नोंदणी केंद्रावर नागरिकांची गर्दी होत होती. परंतु कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेल्याने आधार नोंदणी बंद करण्यात आली आहे. जोवर कोरोनाचा धोका टळणार नाही तोवर आधार नोंदणी प्रक्रिया बंद ठेवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांना आधार कार्डवर दुरुस्ती करून घ्यायची आहे त्यांना आता काही दिवस वाट पहावी लागणार आहे.









