प्राप्तिकर विभागाच्या वेबसाईटवर सुविधा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी आधारवर आधारीत ई केवायसीचा वापर करुन त्वरित पॅनकार्ड मिळण्याची सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा आता ज्याच्याकडे आधारकार्ड आहे, ज्यावर जन्म तारखेचा उल्लेख आहे अशांना मिळणार आहे. ही सेवा निशुल्क असून या सेवेचा लाभ घरबसल्याही घेता येणार आहे.
रिअल टाईम तत्वावर सादर करण्यात आलेली ही सुविधा कागदविरहीत आहे. प्राप्तिकर विभागाने अर्जदारांना विना इलेक्ट्रॉनिक पॅन (ई-पॅन) विनामूल्य देत असल्याचे सांगितले आहे. इन्स्टंट पॅनच्या सुविधेची औपचारिकरित्या सुरु करण्यात आली असल्याने यांची चाचणी बीटा व्हर्जन आयटी विभागाच्या ई फायलिंग वेबसाईटवर फेब्रुवारीपासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
आतापर्यंतचे ई पॅन
प्राप्तिकर विभागाच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या सुविधेची सुरुवात फेब्रुवारीत झाली असून तेव्हापासून 25 मे पर्यंत 6,77,680 ई पॅन सादर करण्यात आले आहेत. 10 मिनिटाच्या सुविधेमधून इतके पॅन कार्ड देण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण 50.52 कोटी पॅन देण्यात आले आहेत. यामध्ये 49.39 कोटी पॅन हे वैयक्तिक पातळीवर देण्यात आले असून यातील 32.17 कोटी पॅनच आतापर्यंत आधार लिंक करण्यात आले आहेत.









