वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लॉकडाऊनच्या कालावधीत विविध ठिकाणी सर्व प्रकारच्या व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु याच काळात आधारकार्डच्या वापरातून पेमेन्ट सिस्टमच्या आधारे करण्यात आलेल्या व्यवहारांचा वेग हा दुप्पट होत 113 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, अशी माहिती अर्थमंत्रालयाने ट्विटच्या आधारे दिली आहे.
उपलब्ध माहितीनुसार 43 कोटींच्या देवाणघेवाणीमध्ये 16,101 कोटी रुपये खात्यांमध्ये पाठविण्यात आले आहेत. तसेच सरकारनेही विविध योजनांमधून दिले जाणारे पैसे थेट लाभार्थीच्या खात्यात जमा करण्यास आधारकार्डच्या नंबरचा आधार घेतला असल्याचे सांगितले आहे.
लॉकडाऊनमध्ये दररोजच्या व्यवहाराप्रमाणे डिजिटल देवाणघेवाण दुप्पट झाली व 16 हजार 101 कोटी रुपये थेट खात्यांमध्ये जमा करण्यात आले तर डिएफएसने सर्व बँकिंग प्रणाली आणि बीसीएस व सीएसपीएसच्या आधारे बायोमॅट्रिक डिव्हाईसच्या माध्यमातून अतिदुर्गम क्षेत्रात ही सेवा पोहोचविण्यास मोठी मदत झाल्याची माहिती दिली आहे.









