चौथी कंपनी लिस्टिंगच्या तयारीत : 2 हजार 500 कोटी उभारण्याचे संकेत
वृत्तसंस्था / मुंबई
देशामध्ये पहिल्या पाचमध्ये समावेश असणारी कंपनी आदित्य बिर्ला म्युच्युअल फंड इनिशिअल पब्लिक ऑफर (आयपीओ) आणण्याची शक्यता आहे. कंपनी सदर योजनेतून जवळपास 2,500 कोटी रुपये उभारण्याची योजना बनवत आहे. सध्या ही चौथी म्युच्युअल फंड कंपनी ठरणार आहे, की जी शेअर बाजारामध्ये लिस्ट होणार आहे. या अगोदर एसबीआय म्युच्युअल फंड पहिल्यादा लिस्ट झाली आहे.
एयूएमच्या (असेट अंडर मॅनेजमेंट)माध्यमातून रक्कम उभारणारी आदित्य बिर्ला ही चौथी मोठी कंपनी म्हणून ओळखली जाणार आहे. आतापर्यंत निप्पॉन म्युच्युअल फंड, एचडीएफसी म्युच्युअल फंड लिस्ट झाली होती. चालू महिन्यात युटीआय म्युच्युअल फंड शेअर बाजारात लिस्ट झाली आहे.
एयूएमच्या आधारे रक्कम उभारणारी एसबीआय म्युच्युअल फंड सर्वात मोठी कंपनी म्हणून नोंद आहे. कारण या कंपनीकडे जवळपास 4.21 लाख कोटी रुपयांचा एयूएम आहे. एचडीएफसी म्युच्युअल फंडने आयपीओच्या मदतीने 2,800 कोटी रुपये जमा केले होते. याच दरम्यान युटीआयने 2,100 कोटी रुपये जमा केल्याची माहिती आहे.
तिमाहीतील एयूएमचा आकडा
म्युच्युअल फंड उद्योगाचा एयूएम सप्टेंबर तिमाहीत 26.86 लाख कोटी रुपये आहे. एसबीआयनंतर 3.75 लाख कोटी रुपये एयूएमसोबत एचडीएफसी दुसऱया स्थानी राहिली आहे.









