सेलिब्रिटी कलाकार त्यांच्या त्वचेचं रहस्य सांगतानाही मेकअप क्लिन केल्याशिवाय आम्ही झोपत नाही असं नेहमीच सांगतात. अभिनेत्री आदिती सारंगधरदेखील झोपण्यापूर्वी एक काम अगदी न विसरता आणि अगदी आवडीने करते. ते काम म्हणजे चेऱयावरचा मेकअप स्वच्छ केला तरी झोपण्यापूर्वी ती गडद रंगाचं लिपस्टीक लावूनच झोपते. आदितीची ही सवय गेल्या कित्येक वर्षापासूनची आहे आणि लिपस्टिक लावून झोपलं की तिला प्रेश वाटतं असं तिचं या सवयीवरचं म्हणणं आहे. एका पुरस्कार सोहळय़ाच्या निमित्ताने आदितीला नटायला किती आवडतं या प्रश्नावर उत्तर देताना तिचं हे सिक्रेट फोडलं आणि तिच्या या हटके सवयीला तिच्या चाहत्यांनीही मनमुराद दाद दिली आहे. आदितीला झोपतानाही अप टू डेट असावं असं वाटतं आणि म्हणून ती केस छान विंचरून, लिपस्टीक लावूनच सगळ्यांना गुडनाइट म्हणते. दिवसभर शूटिंगच्या निमित्ताने मेकअप करावाच लागतो. पण इतर वेळीही जरी घरीच थांबायचं असलं तरी आदिती नीट आवरूनच असते. आदिती सांगते, मला लहानपणापासूनच अजागळ रहायला आवडायचं नाही. पुढे कॉलेजमध्येही व्यवस्थित लूक मेन्टेन करायला मला नेहमीच आवडायचं. अनेकदा असं होतं की बाहेर जायचं असेल तरच आवरायचं आणि घरीच थांबणार असू तर केस कसेही बांधायचे, कानात, गळय़ात, हातात काहीच घालायचं नाही. ट्राउझर आणि टीशर्ट घालून बसायचं हे नेहमीचं चित्र असतं. पण मला हे कधीच आवडलं नाही आणि पटलंही नाही. माझ्याकडे घरी कुणी अचानक धडकलं तरी माझे केस, चेहऱयाचा टचअप, ड्रेस अगदी व्यवस्थित असतो. रात्री झोपतानाही मी नाइट क्रीम लावले की ओठांवर लाल, गुलाबी किंवा कोणत्याही डार्क रंगाची लिपस्टिक लावूनच झोपते. मला तो फिल खूप छान वाटतो. चेहऱयावर रात्रभर मेकअप ठेवण्याचे धोके मला माहित आहेत, म्हणूनच मी हा लिपस्टिक लावून झोपण्याचा पर्याय निवडला. सुरूवातीला माझ्या घरातल्यांना माझ्या या सवयीबद्दल हसू याचचं आता त्यांच्याही हे सवयीचं झालं आहे.
Previous Articleशाहिदसह त्याची पत्नीही क्रिकेटवेडी
Next Article सित्सिपस- रूबलेव्ह यांच्यात अंतिम लढत
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









