सत्तरी तालुक्यात गोवा मुक्तीदिन सोहळा उत्साहात
वाळपई प्रतिनिधी
गोव्याने गेल्या 60 वर्षांत मोठय़ा प्रमाणात प्रगती केलेली आहे .सर्वांनी विकासाच्या माध्यमातून प्रत्येक सरकारने व गोव्यातील प्रत्येक नागरिकांनी आपले महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे . सध्या आत्मनिर्भर भारत व स्वयंपूर्ण गोवा याच्या माध्यमातून गोव्याच्या प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात सामील करून घेण्याचे सरकारचे प्रयत्न यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्यापरीने सहकार्य करण्याचे आवाहन सत्तरी तालुक्मयाचे उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर यांनी केले आहे .
गोवा मुक्ती दिनाच्या हीरक महोत्सवी सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .सत्तरी तालुक्मयातील उपजिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी राज्याचे माजी उपसभापती नरहर हळदणकर माजी आमदार अशोक परब केरी जिल्हा पंचायत सभासद देवयानी गावस नगरगाव जिल्हा पंचायत सभासद राजश्री काळे सत्तरी तालुक्मयाचे गटविकास अधिकारी सूर्याजीराव राणे सत्तरी तालुक्मयाचे संयुक्त मामलेदार संजीवनी सातार्डेकर यांची खास उपस्थिती होती.
यावेळी बोलताना राजेश आजगावकर यांनी सरकारतर्फे कार्यान्वति करण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा फायदा गोव्याच्या तळागाळापर्यंत विस्तारित व्हावा यासाठी सामाजिक संस्था जबाबदार नागरिक व सरकारच्या प्रत्येक कर्मचाऱयाने सहकार्य करणे अत्यंत गरजेचे आहे. समाजाचा विकास हा सरकार एका हाताने करू शकत नाही यासाठी समाजाचे सहकार्य महत्त्वाचे असते .पूर्ण वर्षभर गोवा सरकारने स्वयंपूर्ण गोव्याच्या माध्यमातून वेगवेगळय़ा स्तरावर आयोजित केलेले वेगवेगळय़ा प्रकारचे उपक्रम यामध्ये सर्वांनी सक्रियपणे सहभाग दर्शविणे अत्यंत गरजेचे आहे .गोव्याच्या मुक्तीदिनात गोव्या बरोबरच परराज्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी मोठय़ा प्रमाणात योगदान दिले होते .त्यांना खऱयार्थाने श्रद्धा?जली द्यायची असेल तर प्रत्येकाने विकासाच्या प्रवाहामध्ये सामील होऊन गोवा मुक्ती संग्राम हा खऱया अर्थाने समाजाभिमुख करणे गरजेचे असल्याचे यावेळी ते म्हणाले. सुरुवातीस राजेश अजगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी वाळपई पोलिस स्थानकाततर्फे भारताच्या तिरंग्याला मानवंदना देण्यात आली.
व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत करण्यात आले .यावेळी वाळपई सरकारी माध्यमिक विद्यालय वाळपई अवर लेडी ऑफ लोडस विद्यालय वाळपई श्री हनुमान विद्यालय व वाळपई युनिटी विद्यालयातर्फे खास स्प?र्ती गीते सादर करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुळशीदास मांदेकर यांनी केले व शेवटी त्यांनीच आभार मानले.
दरम्यान या कार्यक्रमाला परिसरातील सरकारी कर्मचाऱयांची उपस्थिती असणे आवश्यक होती.मात्र आज तुरळक उपस्थिती असल्यामुळे अनेकांनी या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण केले. भविष्यात अशा प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सरकारी कर्मचाऱयांनी खास करून उपस्थिती लावावी व हा कार्यक्रम भरगच्च प्रमाणात साजरा होण्यासाठी सत्तरी तालुक्मयाच्या उपजिल्हाधिकारी विशेष लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केली.









