केशरी व कोणतेही रेशनकार्ड नसलेल्या लाभार्थ्यांची योजना
प्रतिनिधी / सातारा
लॉकडाऊनच्या काळात रेशनवरील धान्य काही लाभार्थ्यांना मोफत तर एपीएलच्या लाभार्थ्यांना सवलीतच्या दरात दिली जात होती. तांदूळ, गहू, आणि चना डाळ असे धान्य मिळत होते. परंतु केशरी तसेच कोणतेही रेशनकार्ड नसलेल्यांसाठी आत्मनिर्भर योजना बंद झाली आहे. यामुळे या रेशनधारकांना धान्य मिळणार नाही. याशिवाय रेशन कार्डची ऑनलाईन नोंद झालेली आहे. अशाच लाभार्थ्यांना नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य मिळणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली.
सुरूवातीला शासनाने ऑगस्टपर्यंतची मोफत, तसेच सवलतीच्या दरात रेशनवरील धान्य उपलब्ध केले. गरीब कल्याण योजनेतून साधारण 3 लाख 92 हजार 45 लाभार्थ्यांना 5150.37 मेट्रिक टन गहू व 29110.46 मेट्रिक टन धान्याचे मोफत वाटप करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतर्गंत चार महिन्यांत एकूण 4 लाख 5 हजार 302 शिधापत्रिकाधारकांना 21640.19 मेट्रिक टन गहू, तसेच 13801.2 मेट्रिक टन तांदळाचे वाटप केलेले आहे.
आता शासनाने मोफत धान्याची योजना पुढे नोव्हेंबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्यांची ऑनलाईन असलेल्या रेशनकार्डधारकांना धान्य मिळणार आहे. पण केशरी कार्डधारकांना सवलतीच्या दरात मिळणारे धान्य या महिन्यापासून बंद झाले आहे. त्यामुळे केशरी कार्डधारकांची नोंदणी असेल तरच धान्य मिळणार आहे. तसेच कोणतेही कार्ड नसलेल्या धारकांसाठी लॉकडाऊनच्या काळात शासनाने आत्मनिर्भर योजना सूरू केली होती. या योजनेतर्गंत पाच किलो तांदूळ, एक किलो चना डाळ मोफत दिली जात होती. ही योजना 31 ऑगस्टला संपली आहे. त्यामुळे अशा कुटुंबांना शासनाकडून सवलीतचे धान्य मिळणार नाही.
Previous Articleडाळिंबाला प्रतिकिलो १५७ रुपये विक्रमी दर
Next Article बेंगळूर: सीसीबी पोलिसांकडून अभिनेत्रीच्या घराची झडती








