दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने पूरग्रस्त भागातील 1000 युवतींना मुदत ठेव पावती वितरण
प्रतिनिधी / सांगली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी युवा पिढीला केंद्र तसेच राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा, आणि त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यास मदत करावी असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने पूरग्रस्त भागातील एक हजार मुलींना मुदतठेव प्रमाणपत्र वितरण आणि सामुदायिक विवाह सोहळाप्रसंगी ते बोलत होते. कसबे डिग्रज येथील दीपलक्ष्मी मंगल कार्यालयाच्या आवारात राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
यावेळी बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी, दीपाली सय्यद यांच्या सारख्या समाजसेवा करणाऱ्या लोकांचा राज्य शासनाने गौरव करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर, अलीकडच्या काळात अतिवृष्टी महापुराचा रूपाने निसर्ग आपली परीक्षा घेतोय. या पद्धतीमध्ये सरकार मदत करो अथवा ना करो परंतु नागरिकांनी आपले मनोधैर्य कायम ठेवावे. दीपाली सय्यद भोसले यांच्यासारख्यांची सामाजिक कामे राज्यकर्त्यांसाठी आव्हानच असल्याचे उद्गगार ही त्यांनी यावेळी काढले.
कार्यक्रमास केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील, पालक मंत्री जयंत पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय काका पाटील, यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी आणि पूरग्रस्त भागातील युवक युवती उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








