ऑनलाईन टीम / काबुल :
अफगाणिस्तानातील गझनी शहराजवळच्या लष्करी तळावर झालेल्या कार स्फोटात 26 जवान ठार झाले. तर 17 जवान जखमी झाले आहेत. गजनी प्रांतीय परिषदेचे सदस्य नासीर अहमद फकिरी यांनी या स्फोटाला आणि मृतांच्या संख्येला दुजोरा दिला आहे.
या हल्ल्यात स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा स्फोट घडवून आणण्यात आला. हल्ल्यात जखमी झालेले आणि मृत पावलेले जवान पब्लिक प्रोसिक्युशन पोलीस दलाचे अधिकारी होते. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.
अफगाणिस्तानात सरकार आणि तालिबानच्या नेत्यांमध्ये शांततेसाठी चर्चा सुरु आहे. अमेरिकेनेही अफगाणिस्तानातील सैन्य कमी करण्यास सुरुवात केली आहे.









