ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाचा सामना करण्यासाठी देशात लसीकरणाला वेग आला असतानाच केंद्र सरकारने आज ‘कोविशिल्ड’ लसीच्या डोसबाबत नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. ज्याअंतर्गत आता या लसीचा दुसरा डोस 28 दिवसांऐवजी 56 दिवसांनंतर दिला जाईल.
वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट आणि तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासाच्या आधारे ‘कोविशिल्ड’ लसीच्या दोन्ही डोसमधील कालावधी 4 ते 6 आठवड्यांऐवजी 4 ते 8 आठवड्यांचा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे ज्यांनी 22 मार्चपूर्वी ‘कोविशिल्ड’चा पहिला डोस घेतला असेल, त्यांनाही 56 दिवसानंतरच लसीचा दुसरा डोस मिळणार आहे. ‘कोव्हॅक्सिन’ लसीसाठी हा नियम लागू नाही.