वृत्तसंस्था /नवी दिल्ली :
नवीन वर्षामध्ये (2020) टीव्ही ग्राहकांसाठी टेलिकॉम रेगुलेटरी ऍथोरिटी ऑफ इंडिया (ट्राय) विशेष योजना सादर केली आहे. यामध्ये ग्राहकांच्या संरक्षणासाठी केबल आणि प्रसारण सेवांमध्ये नवीन नियमावलीचा आराखडा सादर केला आहे. यामुळे टीव्ही ग्राहकांना कमी किमतीत अधिक चॅनेल्स पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रसारकांना 15 जानेवारीपर्यंत आपल्या चॅनेल्सच्या दरात बदल करुन 30 जानेवारीपर्यंत नवीन दरांची यादी सादर करावी लागणार आहे. 1 मार्च 2020 पासून नवीन दर लागू करण्यात येणार असल्याची माहिती ट्रायने दिली आहे.
नवीन नियमावली आणि चॅनेल्स
ट्रायच्या नवीन नियमावलीत विविध समीक्षानंतर 200 चॅनेल्ससाठी अधिकचे एनसीएफ शुल्क कमी करुन 130 रुपये केले आहे. उपलब्ध नियमानुसार 130 रुपयात 100 मोफत टु एअर चॅनल मिळणार आहेत. सर्व प्रकारचे कर शुल्क घेऊन 154 रुपयाच्या घरात पोहोचते आहे. यातील 26 चॅनेल प्रसार भारतीचे आहेत.
फ्री टू एअरसाठी
ट्रायच्या नियमाकनुसार ग्राहकांसाठी फ्रि टू एअर चॅनेलसाठी देण्यात येणारे मासिक शुल्कची सीमा 160 रुपये केली आहे. काही टीव्ही मालकांची एकाहून अधिक टीव्ही कनेक्शन असतात, त्यामुळे अतिरिक्त टीव्ही कनेक्शनसाठी 40 टक्के अधिक शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती ट्रायने दिली आहे.