मुंबई /प्रतिनिधी
आता सर्वसामान्यांना देशातील सर्वात मोठ्या बँकेत म्हणजे रिझर्व्ह बँकेत खातं उघडता येणार आहे. आतापर्यंत रिझर्व्ह बँकेशी फक्त बँका आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांना आर्थिक व्यवहार करता येत होते. पण रिझर्व्ह बँकेने आज जाहीर केलेल्या पतधोरणाच्या आढावात सरकारी कर्ज रोख्यामध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्याची दारं खुली केली आहेत. त्यामुळे आता तुमच्या आमच्या सारख्यांना रिझर्व्ह बँकेत खातं उघडता येणार आहेत.
सध्या या कर्ज रोख्यांमध्ये फक्त बँका आणि संस्थात्मक गुंतवणूकदारच गुंतवणूक करु शकतात. पुढील आर्थिक वर्षी केंद्र सरकार जवळपास १२ लाख कोटी रुपये बाजारातून उभे करणार आहे. त्यासाठी सर्वसामन्य गुंतवणूकदारांनाही हा कर्जरोख्यांचा बाजार खुला होणार आहे. जगात बोटावर मोजण्या इतक्या देशांमध्येच ही सुविधा उपलब्ध आहे.
आशियात तर गुंतवणूकीचं साधन कोणत्याच देशात उपलब्ध नाही. त्यामुळे आज रिझर्व्ह बँकेने घेतलेला हा निर्णय देशाच्या अर्थिक क्षेत्राला नवी कलाटणी देणारा मानला जात आहे.