बेळगाव : / प्रतिनिधी
कोरोनामुळे 16 मे पर्यंत न्यायालयीन कामकाज ऑनलाईनद्वारेच सुरू राहणार आहे. आता विविध न्यायालयांचा कारभार काही ठराविक न्यायालयांकडे सोपविण्यात आला आहे. मात्र ही किचकट प्रक्रिया असल्याने त्रासदायक ठरण्याची शक्मयता व्यक्त होत आहे.
न्यायालयीन कामकाज गेल्या 40 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे खटल्यांचे कामकाज प्रलंबित आहे. काही महत्त्वाच्या खटल्यांचाच निकाल ऑनलाईनद्वारे देण्यात येत आहे. आता उच्च न्यायालयाने सर्वच खटल्यांचे कामकाज सुरू करण्याबाबत प्रयत्न केले आहेत. ठराविक दिवशी विविध न्यायालयांकडे खटल्यांचे कामकाज करण्याबाबत नोटिफिकेशन देण्यात आले आहे. ते कामकाजही ऑनलाइ &नाद्वारेच होणार आहे. त्यामुळे ही किचकट प्रक्रिया वकिलांना त्रासदायक ठरण्याची शक्मयता आहे.









