नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉयनंतर आता सुप्रसिद्ध चित्रपट कलाकार आणि माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा ईडीच्या (अंमलबजावणी संचलनालय) रडारवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम आणि मुलगा कुश सिन्हा यांच्या विरोधात जमिनीच्या वादात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 2002 मधील एका जमीन खरेदी-विक्री प्रकरणात थेट ईडीकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. ईडी केवळ आर्थिक घोटाळय़ांच्या प्रकरणांचा तपास करत असल्याने आता याप्रकरणी ईडी कारवाई करते की हे प्रकरण पोलिसांकडे पाठवते हे पहावे लागेल. संदीप दपधे नामक एका इसमाने सिन्हा कुटुंबियांविरोधात तक्रार नोंदवली आहे.









