साताऱयात शानू शेर्पा आणि पसंग शेर्पा यांचा मोहिते कुटुंबियांच्यावतीने सत्कार
प्रतिनिधी/ सातारा
मला लहानपणापासून गिर्यारोहणाची आवड आहे. त्यातूनच आतापर्यंत जगातील उंच शिखरावर मला मोहिमा करता आल्या. आता लवकरच धवलगिरी या शिखरावर जाणार आहे. त्या मोहिमेकरता सुमारे 18 लाख खर्च येणार आहे. त्यासाठी स्पॉन्सरशीप शोधते आहे. उंच ठिकाणी शारीरिक तंदूरुस्त असणे महत्वाचे असते. मी त्यासाठी नित्यनियमाने वर्कआऊट करते. सहसा स्पोर्ट्स आणि सायन्स हे दोन्ही एकत्र जमत नाही. मी मात्र दोन्हीचा मेळ घालते, असे सांगत एव्हरेस्ट कन्या प्रियांका मोहिते हिने माझ्या पाठीमागे माझे बाबा पहाडासारखे उभे आहेत म्हणून मी हे सारे करते, असेही तिने सांगितले.
साताऱयात मोहिते कुटुंबियांच्यावतीने गिर्यारोहक शानु शेर्पा, पसंग शेर्पा यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मोहिते कुटुंबिय व त्यांचे पाहुणे मंडळी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रियांका मोहिते म्हणाली, जगातल्या उंच शिखरावर मोहिमा करणे अवघड असते. मला लहानपणापासून गिर्यारोहणाची आवड असल्याने मी ते शिकत गेले आणि मी ते साध्य करत राहिले. आता धवलगिरी हे नेपाळमधील शिखर सर करायचे आहे. शिखर सर करताना तेथील वातावरणात आपली शारीरिक तंदूरुस्ती महत्वाची असते. आपली मानसिकता सुद्धा तंदूरुस्त असावी लागते. 8 हजार मीटर उंचीवर हवा अत्यंत विरळ असते. ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. त्याठिकाणी नुसते बर्फ असते. त्या बर्फातून वाट काढत शरीराचे तापमान योग्य ठेवत मार्गक्रमण करावे लागते. याकरता मी दररोज वर्कआऊट करते. कांचनगंगा हे शिखर करते वेळी खूप स्ट्रगल केले. मी स्वतः सकारात्मक विचार करते त्यामुळे मला यश साध्य होते.
धवलगिरी या मोहिमेसाठी 18 लाख रुपये लागणार आहे. त्याकरता मी स्पॉन्सरशीप शोधते आहे, असे सांगत प्रियांका म्हणाले, मी जे गिर्यारोहण करते त sमाझ्या बाबांच्या पाठींब्यामुळे. ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्यात सकारात्मक एनर्जी कुठून येते?, मी फार्मा कंपनीत शास्त्रज्ञ या पदावर काम करते. 11 महिने काम करते आणि एक महिना रेस्ट घेते. स्पोर्टस अणि विज्ञान हे एकत्र येत नसतात. माझ्याबाबतीत दोन्ही गोष्टी बॅलन्सिंग आहेत. शाळेत असताना कुठे ट्रेकिंगला गेली की माझी आई अभ्यास करा म्हणायची. तेव्हा मीच म्हणायचे की निसर्गात फिरले की मेमरी शॉर्प होते. कॉलेजमध्ये असताना मी भरतनाटय़म् सुद्धा करायची. पालकांनी आपल्या मुलांवर दबाव न आणता पाल्याला सहकार्य केले पाहिजे असेही प्रियांका मोहिते हिने सांगितले.









