सार्वजनिक ठिकाणी मास्कची सक्ती : ग्रामीण भागात 500 रु. दंड : आज अधिकृत आदेश
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने सूचना देऊनसुद्धा जनतेकडून त्यांचे पालन होत नसल्याने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱयांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. शहरी भागात 1 हजार रुपये तर ग्रामीण भागात 500 रुपये दंड वसूल केला जाणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली असून गुरुवारी यासंबंधीचा अधिकृत आदेश जारी केला जाणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करण्याची सक्ती आहे. मात्र, अनेक जण मास्क घालत नाहीत किंवा मास्क व्यवस्थितपणे घालत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आणि जागृती करण्यासाठी दंडाची रक्कम वाढविण्यात आली आहे. यापूर्वी 200 रु. दंड आकारण्यात येत होता. आता त्यात वाढ करण्यात आली आहे. पोलिसांना याबाबतचे अधिकार देण्यात आले आहेत. पूर्णपणे मास्क न घालणाऱयांना देखील दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, असा इशारा डॉ. सुधाकर यांनी दिला.
कोरोना नियंत्रणासंबंधी कठोर कारवाई आणि दंडाची रक्कम निश्चित करण्यासंदर्भात बुधवारी बेंगळूरमध्ये डॉ. सुधाकर यांनी वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये 50 जणांना प्रवेश देता येईल. त्यापेक्षा अधिक जण एकत्र आल्यास आयोजकांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. ..तर कार्यालयात प्रवेश नाही
सरकारी कार्यालयांमध्ये सर्व कर्मचाऱयांना मास्कशिवाय आतमध्ये प्रवेश दिला जाऊ नये. तसेच बसमध्ये प्रवाशांना मास्क नसेल तर प्रवेश न देण्याची सूचना कंडक्टरना देण्यात येईल. येथेदेखील नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे, असे डॉ. सुधाकर म्हणाले.
नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने
निर्णय योग्य : अतुल पुरोहित
काजू बर्फी आठ दिवस, बुंदी लाडू तीन दिवस, बंगाली बर्फी-रसमलाई 24 तास यासारख्या इतर मिठाई एक आठवडाभर चांगल्या राहू शकतात. राज्यभरात याबाबतचे परिपत्रक आले असले तरी मिठाई दुकानदारांना अद्याप कोणतेही आदेश आले नसल्यामुळे जेव्हा याचे पत्रक येईल, तेव्हापासून अंमलबजावणी करण्यास प्रारंभ होणार आहे. या कामासाठी दिवसभरातील एक तास जादा द्यावा लागणार आहे. हा निर्णय नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्यादृष्टीने योग्य असला तरी पूर्वीपासूनच याचा विचार करून मिठाई विक्री केली असल्याचे अतुल पुरोहित स्वीटमार्टच्या मालकांनी सांगितले.