ऑनलाईन टीम मुंबई :
बॉलीवुड अभिनेत्री कंगना रानौतच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. कंगनाने मुंबई संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र सरकार आता कंगनाच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करणार असल्याची माहिती स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, कंगना ड्रग्ज घेते असे आरोप शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन यांनी एका मुलाखतीत केले होते. त्यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी प्रताप सरनाईक यांनी केली होती. त्याचीही चौकशी आम्ही करणार आहोत.
तसेच महाराष्ट्र पोलिसांचा अवमान करण्याचा अधिकार कोणाला नाही. आम्ही त्याचा निषेध करतो. महाराष्ट्र कुठल्या एका पक्षाचा नाही. तो भाजपचा सुद्धा आहे, भाजपनेही अशा व्यक्तींचा निषेध नोंदवायला हवा, असेही त्यांनी यावेळी म्हटले.









