प्रतिनिधी / सातारा :
आज बहुतांशी व्यवहार हे ‘पॅशलेस’ होवू लागले आहेत. मोठ-मोठय़ा मॉलपासून ते शहरातील साध्या पान टपऱयांपर्यंत प्रत्येक ठिकाणी आपल्याला पॅशलेस व्यवहारासाठी ‘क्युआर कोड’ पहावयास मिळत आहेत. मात्र, हे क्युआर कोड आता साताऱयातील भाजी मंडईतही पोहोचलेले दिसत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी काळापासून देशाला पॅशलेस व्यवहाराची सवय लावण्याचा प्रयत्न केला. त्यात ते यशस्वीही झाले आणि ही सवय शहरांपासून ते ग्रामीण भागात अंगवळणी पडू लागली. आज बाजारपेठेत किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहारात पॅशलेसपणा आल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर पॅशलेस व्यवहाराकरिता फोन पे, गुगल पे, पेटीएम असे ऍप्लिकेशन्स कंपन्यांनी तयार केली असून त्याच्या माध्यमातून आपण कोणत्याही खात्यात कोठूनही पैसे पाठवू शकतो, तेही आपल्या हातातील स्मार्ट फोनवरुन! त्यातूनच व्यावसायिक, तसेच वैयक्तीक खात्यांसाठी आता क्युआर कोड सिस्टीम कंपन्यांनी तयार केली आहे. त्यामध्ये एका विशिष्ठ काळ्या रंगाच्या कोडच्या माध्यमातून आपण आपल्या खात्यातून दुसऱयाच्या खात्यात पैसे विना खाते नंबर वापरता पाठवू शकतो. आज प्रत्येक नागरिकांकडे ऍन्ड्रॉइड मोबाईल फोन, तसेच स्मार्ट फोन असल्याने ही सर्व सुविधा या फोनच्या माध्यमातून वापरली जात आहे, त्यामुळे लोकांना खिशात पैसे बाळगण्याची गरज नाही.
या सुविधांचे अनुकरण सातारा शहरात चांगल्याप्रकारे केलेले पहावयास मिळत आहे. मोठ-मोठय़ा मॉलपासून ते अगदी शहरातील पानटपऱयांवरही आता हे क्युआर कोडचे स्टीकर पहावयास मिळत होते. मात्र, आता सातारा शहरातील भाजी मंडईमधील व्यपाऱयांनीही आपल्या खात्याचे क्युआर कोड काढून त्याचे स्टीकर आपल्या दुकानात ठेवले आहेत, त्यामुळे शहरातील भाजी मंडईची वाटचालही कॅशलेसच्या दिशेने सुरु आहे. येथील रविवार पेठेतील भाजी मंडईत सुनील प्रेम नाईक या व्यापाऱयाने आपल्या दुकानात भाजीपाला खरेदीसाठी येणाऱया ग्राहकांसाठी सोय व्हावी म्हणून कॅशलेस व्यवहाराची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्या माध्यमातून ग्राहकांनी ऑनलाइन पैसे पाठविणे सोपे झाले आहे. सातारा शहरातील बहुतांश नागरिक हा सुशिक्षित व सध्याच्या काळानुरुप बदलणारा असल्याने त्यांनी हा बदलही स्वीकारला आहे. खिशात जरी पैसे नसले किंवा सुट्टे पैसे नसले तरी या व्यापाऱयाने दिलेल्या सुविधेमुळे कॅशलेस व्यवहार करु इच्छीणाऱया ग्राहकांना मात्र सोयीचे झाले आहे. नाईक यांच्या दुकानात सर्वच प्रकारचा भाजीपाला उपलब्ध असल्याने या एकाच दुकानात सर्व खरेदी करता येवू शकते. त्यामुळे ही सुविधा ग्राहकांसाठी सोयीची ठरत असल्याने शहरातील भाजी खरेदीसाठी जाणाऱया नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचेही दिसून येतःःआहे.









