तरुण भारत ऑनलाईन टीम
आजकाल छोट्या पडद्यावर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज होस्ट करताना दिसतात. त्यामध्ये अमिताभ बच्चन, सलमान खान, शिल्पा शेट्टी, माधुरी दीक्षित, सोनाली बेंद्रे यांचा समावेश होतो. पण आता या यादीत आणखी एका बॉलिवूड सेलिब्रिटीचा समावेश होणार आहे.आता अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच जजच्या भूमिकेत दिसणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून परिणीतीला टीव्ही शोचा भाग होण्यासाठी अनेक ऑफर आल्या. मात्र, तिने तिच्या चित्रपटामुळे या ऑफर नाकारल्या. पण आता छोट्या पडद्यावर काम करण्यासाठी तयार झालेय.काही दिवसांपूर्वी ‘हुनरबाज- देश की शान’ या रिअॅलिटी शोच्या निर्मात्यांनी परिणितीकडे जज म्हणून सहभागी होण्यासाठी संपर्क साधला होता. चॅनल आणि निर्मात्यांनी परिणीतीला आश्वासन दिले आहे की, तिचे शेड्युल लक्षात घेऊनच शूटिंगचे नियोजन केले जाईल. अनेक मीटिंगनंतर परिणीतीने शोसाठी होकार दिला आहे. ती या वर्षाच्या अखेरीस त्याचे शूटिंग सुरू करणार आहे. आठवड्यातील एका दिवशी दोन भागांचे शूटिंग होणार आहे. या शोमध्ये परिणीतीसोबतच करण जोहर आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती देखील जज म्हणून दिसणार आहेत.









