प्रतिनिधी/ पणजी
गोव्यात 20 ते 28 रोजीदरम्यान आयोजित केलेल्या 53व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रवेशयोग्यता हा एक प्रमुख पैलू मानला जातो. महोत्सवाचे ठिकाण विविध भौतिक सुविधांसोबतच, विशेष दिव्यांगांना प्रवेशयोग्य करण्यात आले आहे. दिव्यांगांसाठी महोत्सवात दिव्यांगजन विशेष विभाग आणि शैक्षणिक सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

आंचिममधील दिव्यांगजन विशेष विभाग हा सिनेमा सर्वांसाठी सर्वसमावेशक आणि सुलभ बनविण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. या विभागात विशेष दिव्यांग प्रेक्षकांसाठी चित्रपट प्रदर्शन आणि पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापनाच्यासंदर्भात प्रवेशयोग्यतेच्या गरजा लक्षात घेऊन काही चित्रपटांच्या स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले आहे. या विभागातील चित्रपटांमध्ये एम्बेडेड सबटायटल्स, तसेच ऑडिओ वर्णन असतील. ऑडिओ वर्णन हे विशेषतः तयार केलेले ऑडिओ ट्रक आहेत जे चित्रपटातील दृश्य माहितीचे वर्णन करतात. या विभागात अनंत महादेवन दिग्दर्शित ‘द स्टोरीटेलर’, ऑस्कर विजेते रिचर्ड ऍटनबरोचे यांचा ‘गांधी’ हे चित्रपट प्रीमीयर केले जाणार आहेत. सदर चित्रपट सबटायटल्ससह दृकश्राव्यपणे प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
कला निर्माण करण्याची प्रक्रिया सर्वांसाठी सुलभ व्हावी या उद्देशाने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियातर्फे दिव्यांगांसाठी दोन विनामूल्य अभ्यासक्रम आयोजित करण्यात आले आहे. ऑटिझम असलेल्यांसाठी स्मार्टफोन फिल्म बनविण्याचा मूलभूत कोर्स आणि एक मूलभूत अभ्यासक्रम दि. 21 रोजी ते दि. 28 रोजीपर्यंत आयोजिन करण्यात आला आहे.
दिव्यांगासाठी गरजांसाठी स्थळाच्या पायाभूत सुविधांमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. ईएसजीचा परिसर आणि चित्रपट प्रदर्शित होणारी इतर ठिकाणी रॅम्प, रेलिंग, दिव्यांगजनस्नेही टँटाईल वॉकवे, पार्किंग स्पेस, रेट्रोफिटेड टॉयलेट, ब्रेलमधील साईनबोर्ड इत्यादींच्या तरतूदींसह सुलभ करण्यात आले आहे.









