ऑनलाईन टीम / मुंबई :
इंधन दर वाढीवरून अभिनेता अक्षय कुमारला घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपला मोर्चा महानायक अमिताभ बच्चन यांच्या कडे वळवला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांनी 8 वर्षांपर्वी केलेल्या ट्विट वरून त्यांना प्रश्न विचारला आहे.
तुम्ही आता पेट्रोल पंपावर कारमध्ये इंधन भरत नाही का? पेट्रोल भरल्यावर बिलही पहात नाही का? असा खोचक सवाल ट्विट द्वारे करत अमिताभ बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी 24 मे 2012 रोजी केलेल्या ट्विट केले होते. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले होते की, पेट्रोल साडेसात रुपयांनी महाग. त्यावर पेट्रोल विक्रेता विचारतो, कितीचे पेट्रोल टाकू? मुंबईकर म्हणतात – दोन चार रुपयाचे कारवर स्प्रे कर भावा, कार जाळायची आहे. अमिताभ बच्चन यांचे हे ट्विट त्यावेळी खूप व्हायरल झाले होते. या ट्विट मधून तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीका केली होती. त्याच ट्विट ची आठवण करून देत आता जितेंद्र आव्हाड यांनी सवाल उपस्थित केला आहे.
आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, आज मोदी सरकारच्या काळात इंधनाचे दर सातत्याने वाढत असताना अमिताभ बच्चन यांनी मौन धारण केले आहे. पुढे ते आपल्या ट्विट मधून अमिताभ यांना सांगतात की, आता तुम्ही बोललंच पाहिजे. हीच ती वेळ आहे. तुम्ही निश्चितच पक्षपाती नसाल, असा चिमटाही आव्हाड यांनी बच्चन यांना काढला आहे. डिझेल आणि पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. अब मुंबईकर क्या करे कार जलाये या कार चलाये? असा अमिताभ बच्चन यांच्याच स्टाइलमध्ये खोचक सवालही त्यांनी केला आहे.









