ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सर्वोच्च न्यायालयाच्या 50 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारपासून (दि.12) सर्व न्यायाधीश त्यांच्या निवासस्थानातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेतील, असा निर्णय घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर कोर्टरूमसह संपूर्ण न्यायालयाचा परिसर सॅनिटाइज केला जात आहे. त्यामुळे न्यायालयातील सर्व बेंच निर्धारित वेळेपेक्षा 1 तास उशिरा सुरू होतील.









