नवी दिल्ली
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी शुक्रवारी चॅटजीपीटीचे कौतुक केले. ते चॅट जीपीटीबद्दल बोलताना म्हणाले की जग बदलले आहे याचा विश्वास आहे. ओपन एआर यांच्याकडून प्रशिक्षित चॅटजीपीटी हा प्रगत एआय चॅटबॉट आहे. जो वापरकर्त्यांच्या प्रश्नांना मानवासारखी उत्तरे देतो. चॅटबॉट फॉलो-अप प्रश्नांची उत्तरे देतो, चुका स्वीकारतो, चुकीच्या आदेशांना आव्हान देतो आणि अयोग्य आज्ञा नाकारतो.
चॅटजीपीटी हा इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला आहे. 67 वर्षीय मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स म्हणाले की चॅटबॉट्समुळे अनेक कार्यालयीन नोकऱया अधिक कार्यक्षम होतील. गेट्स यांनी एका जर्मन व्यावसायिक दैनिकासोबत बोलताना याबाबी मांडल्या आहेत. डिजिटल मार्केटिंग कंपनी आयक्लब्सवायरचे संस्थापक आणि सीईओ साहिल चोप्रा यावेळी म्हणाले की चॅट जीपीटी हे कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित एक भाषा मॉडेल आहे, जे ओपन एआयच्या आधारे संभाषणासाठी डिझाईन करण्यात आलेले आहे. याचा वापर वाढतो आहे.









