पत्रकार परिषदेत शेतकऱयांची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवार दि. 17 रोजी बेळगाव दाखल होत आहेत. त्यांनी शेतकऱयांशी चर्चा करण्यासाठी वेळ द्यावा. केंद्रसरकारने मंजुर केलेल्या तीन कृषी कायद्यासंदर्भातील माहिती द्यावी, शेतकऱयांवर अन्याय होणार नाही, असे वारंवार सांगितले जात आहे. मात्र हे कायदे जाचक असून त्याबाबत त्यांनी शेतकऱयांना माहिती द्यावी, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा रयत संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
कन्नड साहित्य भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदमध्ये हा इशारा देण्यात आला आहे. हा कायदा अंमलात आल्यानंतर रायचूरमध्ये शेतकऱयांकडून भात खरेदी करण्यात आले. त्यामध्ये शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे. खासगी कंपनींकडून हे भात खरेदी करण्यात आले. खरेदी करताना शेतकऱयांकडूनच सर्व खर्च वसूल करण्यात आला. त्यामुळे शेतकऱयांना फटका बसला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास हे जाचक कायदे शेतकऱयांना मारक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आम्ही एक हजारांहून अधिक शेतकरी उपस्थित राहणार आहे. त्यांना अमित शहा यांनी मार्गदर्शन करावे, भाजपचे नेतेमंडळी आणि कार्यकर्ते साऱयांचीच दिशाभूल करत आहेत. ते थांबावावे, असेही या पत्रकार परिषद वेळी म्हटले आहे. यावेळी रयत संघटनेचे चुन्नाप्पा पुजेरी, प्रकाश नाईक, जयश्री गुरण्णावर, राघवेंद्र नाईक, जावेद मुल्ला यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.









