एप्रिल महिन्यातच तब्बल 2 हजार 602 बालके बाधित आढळून आल्याने प्रशासनाच्यावतीने घेतली खबरदारी
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. याच लाटेत लहान मुलांनाही बाधा होण्याचे प्रमाण मोठे आहे. तिसरी लाट येण्यापूर्वी काळजी घेतली जात आहे. जिह्यात आतापर्यंत 9 हजार331 0 ते 14 वयोगटात कोराना बाधितांची संख्या आहे. तर एप्रिल महिन्यातच तब्बल 2602 जणांना कोरोनाची बाधा झाली होती. 3 जणांचे बळी गेले होते. प्रशासन प्रभावी उपाययोजना आखत आहे.
सातारा जिह्यात तेरा महिन्यात 0 ते 14 वयोगटातील 9हजार 331 बाधित तर 3 जणांचा बळी गेला. 15 ते 30 वयोगटातील 34 हजार398 जण बाधित तर 38 जणांचा बळी गेला. 31 ते 44 वयोगटात 35 हजार563 जण बाधित तर216 जणांचा बळी गेला. 45 ते 60वयोगटातील 34हजार255 जण बाधित तर 828 जणांचा बळी गेला. 60 वर्षापुढील 23 हजार398 जण बादात तर 2021 जणांचा बळी गेला आहे. दुसऱया लाटेला फेब्रुवारीपासून प्रारंभ झाल्यापासून विशेष करुन सातारा जिह्यात मार्चच्या पहिल्या आठवडय़ापासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे.. या लाटेत कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून शहरांमध्ये आणि गावागावात कोरोनाचे अनेक रुग्ण आढळत आहेत.. त्यातच जिह्यातील 0 ते 14 वयोगटातील 2 हजार 22 बालकांना 2 महिन्यात कोरोनाची लागण झाल्याने दुसऱया लाटेबरोबरच तिसरी लाट देखील येते की काय याची भीती व्यक्त केली जात आहे.. मार्च महिन्यापर्यंत 800 ते 900 बालके बाधित झाली तर एप्रिल महिन्यात बाधितांचा आकडा वाढून 3 हजाराच्या पुढे गेला आहे.. जिह्यातील बालके बाधित होण्याचा आकडा नक्कीच चिंताजनक आहे..








