13 हजार जणांना लागण, 9 हजार बाधितांची कोरोनावर मात
गेल्या पाच महिन्यात जिल्ह्य़ात 1 लाख जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. अलिकडे आरोग्य विभागाने स्वॅब तपासणी वाढविली आहे. जिह्यातील 83 हजार 529 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 13 हजार 30 जणांचे अहवाल आतापर्यंत पॉझिटिव्ह आले आहेत. 9 हजार 284 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
बुधवारी जिह्यातील आणखी 324 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 131 जणांचा समावेश आहे. शहर व उपनगरातील 99, ग्रामीण भागातील 32 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. बिम्स् व खासगी इस्पितळातील कर्मचाऱयांचाही यामध्ये समावेश आहे. तर गेल्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
आरोग्य विभागातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बेळगाव, चिकोडी तालुक्मयातील प्रत्येकी दोन व बैलहोंगल तालुक्मयातील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 9 हजार 284 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आणखी 2 हजार 168 जणांचा अहवाल यायचा आहे.
3 हजार 549 सक्रिय रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळांत उपचार करण्यात येत आहेत. बुधवारी दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या 132 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. मृतांचा सरकारी आकडा 197 इतका आहे. तर 27 हजार 913 जण अद्याप होमकेअरमध्ये आहेत.









