प्रतिनिधी/शिरोळ
येथील एका उपनगरात काल, रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मिनीबस मधून एक महिला आल्याने गावात खळबळ उडाली. ही मिनी बस जात असताना जागृत नागरिकांनी या चालकास अडवून विचारणा केली. परंतु चालकाने समर्पक उत्तर न दिल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलिसांनी संबंधित महिला व गाडीत असलेल्या इतरांची चौकशी केली असता ते ऊसतोड मजूर गावी सोडत असल्याची खात्री होताच गावकर्यांना दिलासा मिळाला.
कोरोना विषाणूच्या महामारी पासून शिरोळ नगरीला वाचवण्यासाठी प्रशासन नगरपरिषद व नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. याकरिता परगावाहून आलेल्या लोकांची चौकशी केली जात आहे. यातच काल, रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एका मिनीबस मधून काही महिल। पुरुष शिरोळ मधील एका उपनगरात जात असल्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य विजय आरगे व इतर नागरिकांनी पाहिले. तातडीने या गाडीचा पाठलाग केला करत पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली असता बिजली विभागातील एका साखर कारखान्याचे हे ऊस तोड मजूर असल्याचे समजले. त्यांच्याकडे वैद्यकीय रिपोर्ट व परवाना असलेल्याचे सांगण्यात आले.
याबाबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांनी संबंधित महिलेला ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी नेण्याचे आदेश दिले. व सदर महिलेला 14 दिवसा करता होम क्वारंटाईन करणार असल्याचे सांगितले. बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.