काही शाळांमध्ये एक आड एक दिवशी विध्यार्थी बोलावले : काही पालकांनी मुलांना पाठवलेच नाही : सर्व काळजी घेण्यामध्ये शाळा व्यवस्थापन तत्पर
प्रतिनिधी / सातारा
कोरोनाची एण्ट्री झाल्यापासून शाळांना लॉक लागले होते.तब्बल नऊ महिन्यांनी शाळांचे लॉक उघडून आज शाळा सुरू झाल्या.शाळेची घंटा वाजली ती तब्बल नऊ महिन्यांनी.एका बाकावर एकच विद्यार्थी बसला होता.प्रत्येक विध्यार्थी हा तपासणी करून प्रवेश दिला जात होता.काही पालकांनी काळजीपोटी आपल्या मुलांना शाळेत पाठवले नव्हते. काही शाळांनी पट संख्येच्या कारणास्तव एक आड एक दिवस शाळेत विध्यार्थी येण्याचे नियोजन केले होते.सातारा शहरात प्रमुख सर्व शाळांनी काळजी घेऊन शाळा सुरू केल्याने शाळेच्या आवार गजबजलेल्या अवस्थेत दिसत होता.
शाळा जशी हवी असते तशी ती बाळगोपाळाना नको असते.शाळेतल्या विद्यार्थ्यांना कधी नव्हे ते कोरोनाच्या मुळे तब्बल नऊ महिने सुट्टी मिळाली.काही शाळा-कॉलेजचा परिसर सुरुवातीला परप्रांतीय कामगारांचा निवारा बनल्या होत्या तर पुढे मुंबई व बाहेरून आलेल्या स्थानिक ग्रामस्थांचे आश्रयस्थान बनल्या होत्या.शाळेत शिकणारी मुले मात्र घरात नातेवाईकांच्या सोबत होती.जशा शासनाच्या सूचना येत होत्या तशा शिक्षक फालो करत होते.ऑन लाईन धडे देत होते.आज नववी ते बारावीचे वर्ग पुन्हा सुरू झाले.शाळेत जाण्यासाठी जशा काही पालकांनी पाल्याना हॉसेंने तर काही पालकांनी काळजी पोटी आपल्या मुलांना शाळेत पाठवलेच नाही. सकाळी शाळा सूरु करण्यापूर्वी पालक आपल्या मुलांना शाळेत सोडायला आले होते.शाळांनी मुलांचे तापमान, ऑक्सिजन लेव्हल तपासून हातावर सॅनिटायझर देऊन वर्गात नावाप्रमाणे आत सोडत होते.प्रत्येक बाकावर एक विद्यार्थी बसवला होता.प्रत्येक तासाला एक शिक्षक येत होते.शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या तोंडावर उत्साह दिसत होता.









