नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आणखी तीन राफेल विमाने दाखल झाली. या तिन्ही विमानांनी फ्रान्समधून उड्डाण घेत 7,364 कि.मी.चा प्रवास विनाथांबा पूर्ण केला. गुजरातमधील जामनगर हवाईतळावर ही विमाने यशस्वीपणे उतरविण्यात आली. या विमानांच्या आगमनामुळे देशातील राफेल विमानांची संख्या 8 वर पोहोचली आहे. द्विपक्षीय करारानुसार फ्रान्स येत्या दोन वर्षात भारताला सर्व 36 लढाऊ विमाने पुरवणार आहे.
**EDS: TWITTER IMAGE POSTED BY @Indian_Embassy ON WEDNESDAY, NOV. 4, 2020**Jamnagar: A second batch of three Rafale fighter jets arrived at Jamnagar airbase in Gujarat after flying non-stop from France. With the arrival of the new batch, the number of Rafale aircraft has increased to eight. (PTI Photo) (PTI04-11-2020_000210B)








