कोरोना प्रभावाचा कंपनीला लाभ : विदेशातील गुंतवणूकदारांची पसंती
नवी दिल्ली : देशातील ऑनलाईन शिक्षणातील स्टार्टअप म्हणून बायजूला ओळखले जाते. सदरच्या कंपनीत तीन अमेरिकन कंपन्या नव्याने गुंतवणूक करणार असल्याची घोषणा सदरच्या कंपन्यांनी केली असल्याची माहिती आहे. यामध्ये प्रामुख्याने अमेरिकी इन्वेस्टर फर्म ब्लॅकरॉक इंड, सॅड्स कॅपिटल आणि अल्केन कॅपिटल या कंपन्यांचा समावेश आहे
सदरच्या कंपन्या बायजूमध्ये 2.20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. यातील गुंतवणुकीनंतर बायजूचे मूल्य तब्बल 81.70 हजार कोटी रुपये होणार असल्याची माहिती आहे.
बायजूमध्ये या अगोदर अमेरिकेतील सिल्वर लेक कंपनीकडून 500 दशलक्ष डॉलरची गुंतवणूकीची घोषणा झाली होती. तसेच 2020 मध्ये आतापर्यंत एडटेक स्टार्टअप बायजूला जवळपास 10 हजार कोटींची गुंतवणूक मिळाली आहे.
ऑनलाईन शिक्षणातील तेजीचा प्रभाव
भारतीय ऑनलाईन शिक्षणाच्या विस्तारांतील संकेतामुळे विदेशी गुंतवणूकदारांची रुची देशातील गुंतवणुकीकडे वाढत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून पहावयास मिळत असल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे. याचाच लाभ देशातील एडटेक कंपन्या घेत आहेत.
2020 साठीची गुंतवणूक बायजूने गुंतवणुकीच्या मदतीने जवळपास 10 हजार कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. यामध्ये सिल्वर लेकने 3,672 कोटी रुपये, टायगर ग्लोबल आणि जनरल अटलांटिकने 1.4 हजार कोटीची गुंतवणूक केल्याची नोंद आहे. यासह 27 ऑगस्ट 2020 रोजी बायजूमध्ये अमेरिकन टेक कंपनी डीएसटी ग्लोबलने 900 कोटी रुपये तर अन्य अमेरिकेतील टेक इन्वेस्टरने बॉण्डच्या आधारे जवळपास 700 कोटीचा निधी उभारला आहे.









