प्रतिनिधी/ बेळगाव
तालुक्मयातील विकास कामांना चालना देण्यासाठी ग्रामविकास अधिकाऱयांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र माणसे बघून काम करण्याचे सोडून तालुक्मयाच्या आणि स्वतः असलेल्या ग्राम पंचायतींचा विकास साधावा. याचबरोबर रखडलेल्या कामांना चालना देण्याची गरज असून आळस झटकून कामाला लागा. जे कोणी कामांकडे कानाडोळा करेल, त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी पिडीआंsना दिला आहे.
तालुका पंचायत सभागृहात नुकतीच मासिक आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर तालुका पंचायतचे अध्यक्ष शंकरगौडा पाटील होते. ग्राम पंचायतीमध्ये नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे तालुका पंचायतीमध्ये अनेक नागरिक आपल्या समस्या घेऊन येत असतात. याचा भार वाढत चालला आहे. नको त्या उचापती करण्यापेक्षा कामांवर लक्ष देऊन राहिल्यास सोयीचे ठरेल, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
कलादगी म्हणाले, राज्य सरकार विविध योजना राबवित आहेत. मात्र त्या योजना गरिबांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यासाठी जनजागृती करून नागरिकांना त्याचा लाभ करून द्यावा. कामचुकार पिडीओंनी कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या. घरपट्टी, पाणीपट्टी आणि शौचालयांबाबतही सूचना करण्यात आल्या. घरपट्टी व पाणीपट्टी शिल्लक असल्याने ती तातडीने वसूल करण्याकडे लक्ष द्यावे, असे सांगण्यात आले.
प्रत्येक ग्राम पंचायतीला शौचालयांचा निधी लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असून उर्वरित शौचालयांची कामे पूर्ण करा. ज्यांना खरच शौचालयाची गरज आहे त्यांची नावे तातडीने नोंद करून ती मंजुरीसाठी पाठून द्या, असेही यावेळी सांगण्यात आले. आवास योजनांतून अनेक घरांची कामे रखडली असून ती पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे, असेही कलादगी यांनी सांगितले. यावेळी तालुक्मयातील पिडीओ उपस्थित होते..









