आडेली / वार्ताहर-
आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर झालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.पावसाळी हंगामात रुग्णवाहिका जनतेच्या सेवेत रुजू झाल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आडेली, वजराट, मठ, वेतोरे, पालकरवाडी, दाभोली, खानोली, वायंगणी गावांतील लोकांनी केलेल्या वारंवार मागणीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र आडेली येथे दाखल झालेल्या नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत व आमदार दिपक केसरकर यांच्या आदेशानुसार आडेली माजी सरपंच प्रकाश गडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पालकमंत्री उदय सामंत यांचे कडून जिल्हा खनिकर्म निधी अंतर्गत एक रुग्णवाहिका मंजूर केली होती.यासाठी सचिन गडेकर, संतोष कासले, माजी सरपंच प्रकाश गडेकर, नितीन मांजरेकर, प्रशांत मुंडये यांनी फेब्रुवारी महिन्यात पालकमंत्र्यांना भेटून रुग्णवाहिकेची विशेष मागणी केली होती. त्यावेळी पालकमंत्र्यांनी ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होते. त्याची पूर्तता करत पंचक्रोशीतील जनतेच्या सेवेसाठी लोकार्पण करण्यात आले.आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका मंजूर करून सेवेत दाखल केल्याबद्दल पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दिपक केसरकर यांच्याबाबत जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.









